23.1 C
New York

Raj Thackery : लाडकी बहीण योजना अन् ठाकरेंचा अजितदादा आणि सुप्रिया सुळेंना टोला

Published:

मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती (MahaYuti) सरकारनं नुकत्याच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. लाडकी बहिण आणि लाडके भाऊ एकत्र आले असते. तर दोन्ही पक्ष टीकले असते. त्यासाठी योजनेची आवश्यकता नाही. असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackery) यांनी लाडकी बहिण योजनेवरून अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) टोला लगावला. मुंबईत आयोजित मनसेचा पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी टोलेबाजी केली.

राज ठाकरे म्हणाले की, आपल्याकडं पाण्याच्या, आरोग्या आणि रोजगाराच्या मूळ प्रश्नांवरती बोलायला वेळ नाही. आमच्याकडं काय सुरुए? तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्यासाठी? या योजनांसाठी राज्य शासनाकडं मुळात पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत आणि एकदम कुठले खड्डे बुजवणार आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य शासन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मूळ महाराष्ट्राचे प्रश्न आहेत त्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. हेच तुमचं निवडणुकांचं प्रचार असला पाहिजे. एकमेकांवर फक्त शिव्या द्यायच्या आणि लोकांचं लक्ष विचलीत करायचं यातून निवडणुका करायच्या यातून हाताला काही लागणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तिरक्या चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची वाटचाल कशी राहिल याचे संकेत पुन्हा एकदा दिले आहेत. आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार आहोत. तिकीट मिळालं म्हणजे मी पैसे काढायला मोकळा असा समज कुणीही करुन घेऊ नका. आता मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत. यावर काही जण नक्कीच हसतील पण आता हे घडणार म्हणजे घडणार, असा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img