3.8 C
New York

Panchganga river : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली

Published:

मुसळधार पाऊस राज्याच्या विविध भागात (Heavy Rain) सुरु आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात (Kolhapur) देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं (Panchganga river) धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आली. त्यामुळे कोल्हापूर शहरासह परिसर महापुराच्या उंबरठ्यावर आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पातळी 43 फुटांवर गेली आहे.

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे कोल्हापूरला महापुराचा विळखा घट्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंचगंगा नदीची 43 फूट पातळी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरातील पावसामुळे 81 बंधारे पाण्याखाली गेली आहे. 10 राज्य मार्गांसह 68 मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील पाचशे नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यातील परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता

धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेने बुधवारी मध्यरात्रीनंतर धोका पातळी ओलांडली. त्यामुळे महापुराचा विळखा पडल्याचे स्पष्ट झाले. सध्या राधानगरी धरणातून १५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी आणि वारणा धरणातूनही विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली असून, पंचगंगेची पाणी पातळी रात्री १२ वाजता ४२.९ फूट इतकी होती. पुराचे पाणी नदीकाठची गावे आणि शहरातील काही भागांमध्ये येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील ४०२ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील १०२ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, अलमट्टीतून २. २५ लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img