21 C
New York

Sachin Pilgaonkar-Ashok Saraf: अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांची भर पावसात वडापाव पार्टी

Published:

Sachin Pilgaonkar-Ashok Saraf: ९०चं दशक गाजवणारे आणि अभिनयाला विनोदाची साथ देणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) आणि सचिन पिळगावकर. (Sachin Pilgonkar) ‘अशी ही बनवाबनवी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘अदला बदली’, ‘माझा पती करोडपती’, ‘गंमत जंमत’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र दिसली. आता पुन्हा एकदा सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ ही जोडी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sachin Pilgaonkar-Ashok Saraf: नुकतीच ‘नवरा माझा नवसाचा २’या चित्रपटाची रिलीड डेट जाहीर करण्यात आली आहे. यानिमित्ताने सचिन पिळगावकर, अशोक सराफ, आणि सुप्रिया पिळगावकर यांनी मुंबईमधील श्री सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं. गणरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनी वडापाव खाण्याचा आनंद लुटला. सचिन पिळगावकर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ या व्हिडिओमध्ये भर पावसाची मजा घेत वडापाव खाताना दिसत आहेत.

“बाप्पाचं दर्शन, मस्त पाऊस, वडापाव…आणि तो सुद्धा किर्ती कॉलेजच्या जवळचा अशोक वडापाव…बाजूला अशोक आणि हातामध्ये अशोक वडापाव…हा बडा भाव आणि हा वडापाव…” असं सचिन पिळगावकर या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रचंड लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अरमान मलिक-कृतिकाच्या ‘त्या’ अश्लील व्हिडीओवरून वाद, जिओ सिनेमाने दिल स्पष्टीकरण

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये अशोक सराफ यांनी लालू कंडक्टरची भूमिका केली होती. मात्र, ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये मात्र मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ते लालू कंडक्टर नव्हे तर टीसी(Ticket Checker) च्या भूमिकेत दिसणार आहेत. २० सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img