4 C
New York

Raj Thackeray : विधानसभेबाबत राज ठाकरेंची मोठी घोषणा

Published:

मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकी (Assembly Elections) करता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी मुंबईतील (Mumbai) पक्षाच्या मेळाव्यातून रणशिंग फुंकले. कार्यकर्ते मेळाव्यामध्ये विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत मनसे 225 ते 250 जागा लढवणार अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. कोणाशी युती होईल किंवा आपल्यासाठी कोणती जागा सुटेल, याचा विचार करत बसू नका. आपल्याला 225 ते 250 जागा लढवायच्या आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आता महायुतीचे नेते राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी शिवतीर्थवर जाणार का, हे पाहावे लागेल.

तसेच मनसे सोडण्याच्या तयारी असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी भाष्य केले. मी विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची यादी बघत होतो. कोण कुठल्या पक्षात आहे, हेच कळत नाही. आपल्यातील काही लोकही जाण्याच्या तयारीत असल्याचे चर्चा आहे. मी त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालेन, त्यांनी खुशाल दुसऱ्या पक्षात जावे आणि स्वत:चे नुकसान करुन घ्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img