Madhuri Dixit Cooking Video: पावसाळा सुरु झालाच की, आपल्याला कुठेतरी बाहेर फिरायला जावंस वाटतं, किंवा बाहेर फिरायला जाऊन गरमा-गरम काहीतरी चविष्ट खावंसं वाटत. तर काहींना घरातचं चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. या थंडगार वातावरणात वडापाव, पाणीपुरी, कांदा भजी, मिसळ आणि त्यासोबत एक चहा असे पदार्थ हवेहवेसे वाटतात. परंतु, धकाधकीच्या जीवनात बहुतेक लोक आरोग्याची काळजी घेत असल्याने अशा तेलकट पदार्थापासून जरा दूरचं राहतात. या सगळ्यांसाठी चक्क ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) ऑइल फ्री कांदा भजीची रेसिपी सांगितली आहे. ‘धकधक गर्ल’ने तिचे पती डॉ. नेने यांच्या युट्यूब चॅनेलवर कांदा भजीचे एकूण पाच प्रकार करून दाखवले आहेत. यामुळेच आरोग्य जपणाऱ्या लोकांना निश्चितच फायदा होईल असं डॉ. नेने या व्हिडीओमध्ये सांगत असल्याचं पाहायला मिळतंय.
Madhuri Dixit Cooking Video: ९० चं दशक अगदी हरहुन्नरी म्हणून गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) ओळखलं जातं. ‘धकधक गर्लने’ तिच्या सहज-सुंदर अभिनयाने सर्वांना भुरळ पाडली होती. आजही माधुरी दीक्षितच्या अभिनयाचे व नृत्याचे लाखो चाहते आहे. माधुरीने १९९९ मध्ये करिअरच्या शिखरावर असताना डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांच्याशी लग्नगाठ बांधली. यानंतर अभिनेत्रीने अमेरिकेत जाऊन आपला संसार मांडला. काही वर्षांनी भारतात परत आल्यावर माधुरी पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाली. नुकतीच माधुरीने खास पावसाळ्यानिमित्त डॉ. नेनेंबरोबर कांदा भजी बनवली आहे. मात्र, अभिनेत्रीने आरोग्याच्या दृष्टीकोनातून एकूण 5 प्रकार या भजीचे चाहत्यांना बनवून दाखवले आहेत.
अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांची भर पावसात वडापाव पार्टी
माधुरीने डीप फ्राय ( पारंपरिक भारतीय पद्धत ), पॅनको, एअर फ्राय, शॅलो फ्राय,आणि बेक्ड अशा पाच प्रकारची कांदा भजी बनवली आहे. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये म्हणते, “तळलेली भजी खाणं हे वेगळ्या प्रकारचं सुख आहे परंतु, अनेकवेळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून बेक्ड भजी किंवा बेक्ड पकोडे खाल्लेलं कधीही उत्तम त्यामुळे मी खास पाच प्रकारच्या भजी बनवल्या आहेत.” पुढे डॉ. नेने सांगतात, “तुम्हाला तेलकट खायचं नसेल, किंवा मनाई असेल, तर अशाप्रकारे भजी तुम्ही बनवू शकता यामुळे तुमच्या आरोग्याला त्रास होणार नाही.”
Madhuri Dixit Cooking Video: माधुरीने व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे, भजीचं बॅटर तयार करून तुम्ही भजी ओव्हनमध्ये बेक्ड करू शकता, तव्यावर शॅलो फ्राय करून खाऊ शकता, एअर फ्रायरमध्ये तळू शकता, किंवा पारंपरिक पद्धतीने तळून या भजी खाण्याचा आनंद लुटू शकता. ही भजी बनवल्यानंतर माधुरी, तिचे पती व मुलगा या तिघांनी मिळून गरमागरम मसाला चहा बनवला. या तिघांचं बॉण्डिंग व प्रेम पाहून नेटकऱ्यांनी देखील नेने कुटुंबीयांचं कौतुक केलं आहे. या व्हडिओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.