3 C
New York

Kangana Ranaut : कंगनाची खासदारकी धोक्यात, न्यायालयाने धाडली नोटीस

Published:

हिंदी चित्रपटसृष्टीत पंगा गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणावत आता (Kangana Ranaut) खासदार आहे. लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील (Mandi Lok Sabha) मंडी मतदारसंघातून तिने विजय मिळवला होता. या खासदारकीच्या माध्यमातून राजकारणाची इनिंग (Lok Sabha Elections) सुरू केलेली असतानाच एक धक्का देणारी बातमी आली आहे. कंगना राणावतची खासदारकी रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

यानंतर न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली असून येत्या 21 ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. याबाबत आधिक माहिती अशी, लायक राम नेगी यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. नेगी यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती. मात्र त्यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करण्यात आला असा आरोप त्यांनी या याचिकेत केला आहे. नेगी हे वनविभागाचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

लाडकी बहीण योजना अन् ठाकरेंचा अजितदादा आणि सुप्रिया सुळेंना टोला

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांना सरकारी निवासस्थानाचे वीज, पाण्याचे नो ड्यूज प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले गेले होते. यासाठी एक दिवसाचा वेळ देण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी कागदपत्रे दिली. त्यावेळी मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्रे घेण्यास नकार दिला आणि उमेदवारी अर्ज रद्द केला असे नेगी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेगी यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. आता जर नेगी यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे रद्द झाल्याचे कोर्टातून सिद्ध झाले तर कंगना राणावतची खासदारकी रद्द होण्याची दाट शक्यता राहते. त्यामुळे कोर्ट या प्रकरणात सुनावणी घेऊन काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाजपच्या तिकीटावर कंगनाने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. मंडी मतदारसंघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला होता. कंगनाची ही पहिलीच निवडणूक होती. कंगनाने पहिली निवडणूक जिंकली. कंगना यांनी विक्रमादित्य सिंह यांच्यावर 73 हजार मतांनी मात केली. कंगनाला 5 लाख 03 हजार 790 मतं मिळाली. विक्रमादित्य सिंह यांना 4 लाख 30 हजार 534 मतं मिळाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img