8 C
New York

Dombivli Heavy Rain : डोंबिवलीत तुफान पाऊस, लोढा हेवनमध्ये साचले पाणी

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, (Kalyan-Dombivli) अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि ग्रामीण भागात मागील काही तासांपासून पावसाचा (Rain) जोर प्रचंड वाढला आहे. बुधवार रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने (Dombivli Heavy Rain) डोंबिवली, ग्रामीण भाग आणि लोढा निळजे लोढा हेवन परिसरात पाणीच पाणी साचले होते. येथील भाजपा पदाधिकारी रवींद्र पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे मुकेश भोईर यांनी पालिका प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हेवन मध्ये दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,गावदेवी चौक तसेच अनेक सोसायटीच्या आवारात पावसाळ्यात तुडुंब पाणी भरत असते. निळजे लोढा येथील भाजपा पदाधिकारी रवींद्र पाटील यांच्याही कार्यालयात पाणी साचले होते. याबाबत पाटील म्हणाले, महापालिका प्रशानाकडून यावेळी गटर नाले व्यवस्थित साफ न केल्याने यावर्षी त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. सकाळ पासूनच अनेक नागरिकांनी सोसायटीच्या आवारात पाणी साचले होते. पालिकेने पावसाळ्यापूर्वी येथील परिस्थितीचा आढावा घेतला असता असता तर आज येथील नागरिकांचे हाल झाले नसते. तर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मुकेश भोईर म्हणाले, निळजे लोढा हेवन मध्ये नाले सफाई झाली नाही. पालिका प्रशासनाने याठिकाणी गंभीर्याने लक्ष देऊना काम केले असते तर पाणी साचले नसते.

मुसळधार पावसाने डोंबिवली व ग्रामीण भागात पाणी साचल्याने पालिकेचे आपत्कालीन कक्षातील कर्मचारी या ठिकाणी पोहचतील का? त्यांच्याकडे पुरेशी साहित्य सामुग्री आहे का? आपत्कालीन कक्षाचा दूरध्वनी क्रमांक लागतो का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img