8.7 C
New York

Heavy Rain Alert : मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला उद्यापर्यंत पावसाचा रेड अलर्ट

Published:

मुंबई

महाराष्ट्राच्या बहुतांश (Maharashtra Rain) भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain Alert) सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि रायगड (Mumbai Rain) या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट दिला आहे. मुंबईभोवती पाणीच पाणी साचले आहे. मिठी, उल्हास नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने, मुंबई महानगराला उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. कल्याण स्टेशनजवळ असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कपोते वाहन तळासमोर गुडघाभर पाणी साचलंय. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं योगी धाममध्ये लाखो रुपये खर्च करून सिटी पार्क उभारण्यात आलाय. या पार्कच्या बाजूलाच वालधुनी नदी आहे . गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिटी पार्क जलमय झालाय.

मुंबईतील मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच वाहतकुकीवर देखील मोठा परिणाम पावसामुळे झालाय. तर सध्या मिठी नदीची पाणी पातळी २.६ मीटर असून, २.७ वर गेल्यास धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस असल्याने विहार तलाव ओव्हर फ्लो झालाय,याचा परिणाम मिठी नदीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर परिणाम, मध्य रेल्वे 20 ते 25, हार्बर 15 ते 20 तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिराने सुरू आहे. मुंबईत सर्व मार्गावरील लोकल सुरू मात्र उशिराने सुरू आहे.  मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने  तर धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिराने सुरू आहे.  हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने आहेत. तसेच पश्चिम रेल्वेच्या लोकल 10 मिनिटे उशिराने धावत आहेत जोरदार पाऊस असल्याने गाड्यांचा वेग मंदावला असून कर्जत कसारा इथून येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस जास्त उशिराने आहेत. 

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे जलमय  सबवे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद  करण्यात आला आहे.   पश्चिम उपनगरात मागील एक तासापासून सुरू असलेला मुसळाधार पावसामुळे अंधेरी सबवे पाणी खाली गेला आहे.  अंधेरी सबवे खाली सहा ते सात फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

मुंबई, पुणे, रायगड इथे जास्त पाऊस पडतोय. सर्व प्रशासनाला सकाळपासून सूचना केल्या आहेत. अर्लट मोडवर राहून प्रशासनाला लोकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धरण, कॅचमेंट एरियात खूप पाऊस झाला. त्याचा डबल फटका बसला. लष्कर, नौदल एअर फोर्सची बचाव पथकं सज्ज आहेत. गरजेनुसार लगेच पावल उचलली जातायत. आपातकालीन परिस्थिती ओढवली, तर लोकांना एअरलिफ्ट केलं जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img