21 C
New York

Satara Koyna Dam : कोयना, कृष्णा नदीकाठाला पुराचा धोका

Published:

कोयना धरण धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर पोहोचला आहे. (Satara Koyna Dam) त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी दुपारी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडले जाणार आहेत. सातारा – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत. दरवाजातून १० हजार आणि आणि पायथा वीजगृहातून १०५०, असा एकूण ११ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे.

Satara Koyna Dam पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या ठिकाणी चोवीस तासात विक्रमी ७०७ मिलीमीटर पाउस झाला आहे. यामुळे धरणात प्रतिसेकंद ७५ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. एका रात्रीत पाणीसाठ्यात तब्बल ४ टीएमसीने वाढ होऊन पाणीसाठा ७५ टीएमसी झाला आहे. चोवीस तासात कोयनानगर येथे १६३ मिलीमीटर, नवजा येथे २३७ आणि महाबळेश्वरमध्ये ३०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मुसळधार पावसामुळे पुणे, सांगलीत शाळा बंद

Satara Koyna Dam कोयना, कृष्णा नदीकाठाला पुराचा धोका

कोयना आणि कृष्णा नढ्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आता धरणाचे दरवाजे उघडून एकूण ११ हजार ५० क्युसेक्स इतका विसर्ग होणार असल्यानं कोयना आणि कृष्णा नदीकाठाला पुराचा धोका वाढला आहे.

Satara Koyna Dam सांगलीतील पुराची पातळी वाढणार

कोयना धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळं कृष्णा नदीच्या पुरामध्ये वाढ होणार आहे. सांगली शहराच्या नागरी भागात बुधवारीच पाणी शिरलं होतं. त्यामुळे लोकांचं सुरळीतस्थळी स्थलांतर करण्यास सुरूवात झाली होती. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर सांगलीतील पुराची पातळी आणखीनच वाढणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img