21 C
New York

Mumbai Local Train : मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Published:

मुंबईसह उपनगरात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. (Mumbai Local Train) ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंधेरी तसेच नवीन मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका रेल्वेला बसला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक (Mumbai Local Train) आज गुरुवारी पहाटेपासून १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. परिणामी रेल्वेस्थानकावर सकाळपासून प्रवाशांची गर्दी होत आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील गाड्या ५ ते १० मिनिटं उशिराने सुरु आहे. तर ५ मिनिटे उशिराने हार्बर मार्गावरील लोकलसेवा धावत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुंबईसह पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा (Mumbai Heavy Rain) फटका लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेनला देखील बसला आहे. मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस आज उशिराने धावत आहे.गुरुवारी सकाळी ७ वाजेपर्यंत डेक्कन एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात उभी होती. त्यामुळे मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. अनेक प्रवासी ट्रेन सुटण्याची वाट पाहत रेल्वेस्थानकावरच ताटकळून पडले होते.

कोयना, कृष्णा नदीकाठाला पुराचा धोका

Mumbai Local Train मुसळधार पावसामुळे अंधेरी सब-वे पाण्याखाली

पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुंबईत सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, मालाड, बोरिवली या भागात पावसाचं पाणी साचल आहे. अंधेरी सब-वे दोन फुटापर्यंत पाणी मुसळधार पावसामुळे भरले आहे. त्यामुळे पोलिसांकडून अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img