26.6 C
New York

Diva Rain : पावसाच्या पाण्याने दिव्यात नाले तुंबली

Published:

शंकर जाधव, दिवा

दिव्यात नालेसफाईची (Diva Rain) कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत.पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेले दिव्यात दिसत आहे. दिवा प्रभाग समितीचे स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी व ठेकेदार यांना जबाबदार धरून कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी केली आहे.

दिवा प्रभाग समितीचे स्वच्छता अधिकारी म्हणून डोंगर परदेशी हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाल्या आधी करणे अपेक्षित होते. अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही. वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने दिवा टर्निंग विभागात चंद्रंगण रेसिडेन्सी परिसरात भरपूर प्रमाणात पाणी साचून लोकांचे अतोनात हाल होत आहेत. दिवा शहरात दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात पाहायला मिळतो.मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी धडा घेणार नसतील तर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर युवा अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी सांगितले.

दिवा शहरात पालिका प्रशासनाचे स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी नीट जबाबदारी पार पाडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. यामुळे प दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असेही अभिषेक ठाकूर यांनी सांगितले आहे.दिवा शहरात जो गलिच्छपणा व अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याबाबत सुद्धा स्वच्छता निरीक्षकांनी भूमिका घेणे अपेक्षित होते, मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचे प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे असेही अभिषेक ठाकूर यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img