21 C
New York

Bigg Boss OTT 3: अरमान मलिक-कृतिकाच्या ‘त्या’ अश्लील व्हिडीओवरून वाद, जिओ सिनेमाने दिल स्पष्टीकरण

Published:

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT 3) सिझन तिसरा चांगलाच गाजताना पाहायला मिळतंय. मात्र हे पर्व सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. यंदाच्या तिसऱ्या पर्वात अरमान मलिक (Arman Malik) व त्याच्या दोन पत्नी या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. यानंतर पुढे काहीच दिवसांत अरमानची पहिली पत्नी पायल मलिकला (Payal Malik) घरचा रस्ता दाखवण्यात आला. सध्या अरमान व त्याची दुसरी पत्नी कृतिका (Krutika Malik) या ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहेत. या दोघांचा कथित अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून हा शो वादात अडकला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’वर सगळीकडूनच टीका करण्यात येत आहे. आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी देखील या शोच्या विरोधात तक्रार करत हा शो बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता सर्वत्र झालेल्या टीकेनंतर जिओ सिनेमाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Bigg Boss OTT 3: Bigg Boss OTT मधील हा व्हिडीओ छेडछाड करून एडिट केलेला असून तो व्हायरल करण्यात आल्याचं जिओ सिनेमाकडून सांगण्यात आलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या निर्मात्यांनी यासंदर्भात बुधवारी ( २४ जुलै ) मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली आहे.

नवऱ्यासह डान्स करत पूजा सावंतने परदेशातून केला रोमँटिक व्हिडिओ शेअर

“जिओ सिनेमा अ‍ॅपवर प्रसारित केल्या जाणाऱ्या सर्वत्र कंटेटवर कंपनीचे लक्ष असतं. यासाठी आमच्याकडे अत्यंत कठोर नियम व मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ‘बिग बॉस ओटीटी तिसऱ्या पर्वा’मधून असा कोणत्याच प्रकारचा चुकीचा कंटेट प्रदर्शित झालेला नाही. जो अश्लील व्हिडीओ व्हायरल होत आहे त्याच्या खऱ्या व्हिडीओमध्ये छेडछाड करून हा व्हायरल करण्यात आला आहे. व्हायरल होणारा हा अश्लील व्हिडीओ हा खोटा व बनावट आहे. अशाप्रकारचा बनावट आणि खोटा व्हिडीओ व्हायरल होणं हा विषय अगदी चिंताजनक आहे. कृपया यामागच्या खऱ्या आरोपीचा शोध घ्यावा.” असं निवेदन जारी करत जिओ सिनेमाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

Bigg Boss OTT 3: अरमान मलिक व त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक यांच्यातील कथित आक्षेपार्ह कृतीचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांआधी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर Bigg Boss OTT हा कौटुंबिक शो असल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं, यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाऊ लागली. नेटकऱ्यांनी या कृत्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली होती. तर काहींनी या खोट्या व्हिडिओवर संताप व्यक्त केला होता. यानंतर ओटीटीच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत हा व्हिडीओ बनावट असल्याचं सांगत आता सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img