मुंबई
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. देशमुख हे जेलमध्ये होते. आता बेलवर आहेत. त्यांच्याबाबत अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांना थेट आव्हान दिले होते. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनीही फडणवीसांना प्रतिआव्हान दिले आहे.
काल देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत बोललो, माझावर दबाव होता असं वक्तव्य केले. अनिल देशमुख पुराव्याशिवाय बोलत नाही. कशा पद्धतीने माझ्यावर दबाव टाकला. आमच्या नेत्यांवर आरोप करण्यात सांगितले. याचे सर्व पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दबाव होता, यात माझाकडे एक पेन ड्राईव्ह आहे. त्यात पुरावे आहेत असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की माझ्याकडेही व्हिडिओ क्लीप आहेत. त्यामध्ये मी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत काही बोललो. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे त्यांनी ते व्हिडीओ क्लिप जाहीर कराव्यात. वेळ आल्यावर मी हे पुरावे दाखवेल असा दावा अनिल देशमुख यांनी केला असून देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहेत.
पण देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दबाव टाकला होता. माझाकडं एक पेन ड्राईव्ह आहे, त्यात सर्व पुरावे आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधातील व्हिडीओ क्लीप जाहीर कराव्यात. वेळ आल्यावर मी हे पेनड्राईव्हमधील पुरावे दाखवेल असही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.