21 C
New York

Ajit Pawar : पुण्यातील पुराचं अजितदादांनी सांगितलं कारण

Published:

पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain) अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. आज सकाळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत मी सतत हवामान खातं आणि अधिकाऱ्यांसोबत बोलत आहे, अशी माहिती दिली.

पुण्यात पुढेही पाऊस राहणार आहे. मी तातडीने पुण्याला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केलं आहे. एकता नगरमध्ये स्वत: आयुक्त पोहचले आहेत, असं अजित पवारांनी सांगितले. जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. गेले दोन-तीन दिवसाच्या पावसामुळे आत्ता जमीन सगळी ओली आहे. पुण्यात पेव्हर ब्लॉक आणि सिमेट काॅक्रीट रस्ते आहे. पुण्यात सकाळी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नदी ओव्हरफ्लो सगळीकडे पाऊस असल्याने झाली असल्याने सकल भागात पाणी साचलेले आहे, असं अजित पवारांनी सांगितले.

सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरा एकनाथ शिंदेंचे आदेश

Ajit Pawar …म्हणून इतकी भयानक परिस्थिती झाली- अजित पवार

खडकवासला धरण हे अवघं पावणेतीन टीएमसीचं आहे. परंतु वरच्या भागातच आठ इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे एकदम तीन टीएमसी पाणी धरणात आलं. आम्ही एक कटाक्षाने बघितलं की, रातोरात धरणाचं पाणी सोडायच्या ऐवजी पहाटे धरणाचं पाणी सोडण्याचा प्रयत्न आम्ही केला,जेणेकरुन नागरिकांना सोयीचं व्हावं, असं अजित पवार म्हणाले. शाळांना ताबडतोब सुट्टी देण्यात आली. पुण्यात सकल भागात पाणी साचलेलं आहे. सगळीकडेच पाऊस पडल्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे. त्यामध्ये नदीच्या दोन्ही बाजूने येणारं पाणी आणि ओढा-नाल्यांमधून येणार पाणी, यामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. माझ्याकडे साधारण पाच दिवसाचा म्हणजे 24 तारखेचा 25 तारखेचा 26 तारखेचा 27 तारखेचा 28 तारखेचा अशा पद्धतीचा अंदाज आहे. अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Ajit Pawar सर्वांनी फिल्डवर उतरा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. फिल्डवर सर्व अधिकाऱ्यांना उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनला सतर्कतेचा आदेश दिले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील बोललो आहे. मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img