4.1 C
New York

Kalyan : कल्याण तहसीलदार कार्यालयबाहेर साचले पाणी

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून रेल्वे सेवेवर याचा परिणाम दिसून आला. पावसाळ्याआधी काम करून ज्या ठिकाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी काम करणे आवश्यक असते. बुधवार 24 तारखेला मुसळधार पावसाने कल्याण कोर्टबाहेरील परिसर आणि कल्याण (Kalyan) तहसीलदार कार्यालयाबाहेर (Kalyan Tehsildar office) साचले होते. नागरिकांना याच पाण्यातून वाटकाढत जावे लागत होते. मनसेने यावर प्रशासनावर नाराजी. व्यक्त करत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी कां खेळत आहे असा प्रश्न उपस्थित केला.

मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी कल्याण कोर्ट बाहेरील व कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेरील परिसरात पाणी साचल्याने प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी असल्याचा असल्याचे सांगितले. या पाण्यातून चालताना लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2005 साली महापुरात कल्याण डोंबिवलीतील अनेकांना या रोगाची लागण झाली होती. येथील पाण्याचा निचरा का होत नाही? पावसाळापूर्वी येथील काम का केले नाही? यांचे उत्तर नागरिक मागत असून प्रशासनाला जाग कधी येणारअसा प्रश्न मनसे माजी नगरसेवक घरत यांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img