21 C
New York

Sunil Shetty: लेकीला चित्रपटात घेतलं अन् सुनील शेट्टीने केला दिग्दर्शकाला थेट बंगलाच गिफ्ट;

Published:

Sunil Shetty: आपल्या अभिनयाने ९०चं दशक गाजवणारा अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी.(Sunil Shetty) बॉलीवूडमधला अण्णा सुनील शेट्टीच्या लेकीने आणि लेकाने सुद्धा अभिनयात नशीब आजमावलं होत. मात्र, वडिलांसारखी छाप त्यांना पाडता आली नाही. अभिनेत्री अथिया शेट्टीने (Athiya Shetty) २०१५ साली वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होत. लाडक्या लेकीला चित्रपटात काम दिल म्हणून सुनील शेट्टीनं कास्टिंग दिग्दर्शकाला थेट बांगलाच म्हणून भेटवस्तू दिली होती. मुकेश छाबडा (Mukesh Chhabra) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.

Sunil Shetty: नुकतंच भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिम्बाचिया (Harsh Limbachiyaa) यांच्या पॉडकास्टला मुकेश छाबडा यांनी हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. “ज्यावेळी मी कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली, त्यावेळी आराम नगर येथे सुनील शेट्टीचा १६० नावाचा एक बंगला होता. तेव्हा मी अथिया शेट्टीबरोबर हिरो नावाचा चित्रपट करत होतो. सुनील शेट्टी मला म्हणाले, तू या छोट्या ऑफिसमध्ये का काम करत आहेस? माझा आराम नगर इथला बंगला घे. त्यावेळी मी त्यांना म्हणालो मी थोडं दबावात आहे. त्यावर ते म्हणाले की, जास्त त्रास आणि टेन्शन घेऊ नकोस. फक्त चांगलं काम कर”, असं मुकेश छाबडा यांनी सांगितलं.

मराठीमधला Highest Paid आहे ‘हा’ अभिनेता!

Sunil Shetty: पुढे त्याने म्हंटलं, “सुनील शेट्टी यांनी स्वतः केलेल्या चांगल्या कामाबद्दल कधीही कोणाला सांगणार नाहीत. त्यांनी आराम नगरमधला एवढा मोठा बंगला मला न विचार करता दिला. ते म्हणाले भाड्याची चिंता करू नकोस. माझ्या मुलीसाठी तू खूप काही केलं आहेस. फक्त हा बंगला तुला ठेवून घे, असं ते म्हणाले. त्यानंतर मी तिथे माझं काम सुरू केलं. या नवीन ऑफिसचं उद्घाटन केलं. मी जवळच्या मित्रांसोबत काम केलं आणि कंपनी उभी केली. आता दिल्ली, चंदिगड, आणि लंडनमध्येही माझं ऑफिस आहे”.

अथिया शेट्टीने २०१५ साली हिरो चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी केलं होतं. अथियाबरोबर या चित्रपटात आदित्य पांचोली दिसला होता. यानंतर अथियाने मोतीचूर चकनाचूर, मुबारका, सारख्या चित्रपटांत काम केलं आहे. क्रिकेटर के एल राहुलशी लग्न करत तिने संसार आपला थाटला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img