7.3 C
New York

MCA : एमसीए च्या अध्यक्षपदी पवारांच्या या शिलेदाराची निवड

Published:

निर्भयसिंह राणे

MCAच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबई क्रिकेट असोसिएशनला नवा अध्यक्ष मिळाला ते म्हणजे अजिंक्य नाईक (Ajinkya Naik), ज्याने त्यांचे प्रतिस्पर्धी संजय नाईक यांचा 100 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. गेल्या आठवड्यात हि निवडणूक झाली, ज्यात अजिंक्य यांने MCAचे उपाध्यक्ष संजय नाईक यांचा 221-114 असा एकांगी लढतीत पराभव केला. अमोल काळे यांचे गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये T20 विश्वचषकादरम्यान निधन झाल्याने MCAचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. भारताच्या माजी महिला कर्णधार डायना एडुल्जी आणि जितेंद्र गोहिल यांनी अजिंक्य नाईकांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यापूर्वी ते MCAचे सचिव होते.

IND vs SL: श्रीलंकाने T20I मालिकेसाठी केला संघ जाहीर, हा खेळाडू करणार नेतृत्व

“आज झालेल्या MCA निवडणुकीत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडून आलेले श्री.अजिंक्य नाईक यांचे हार्दिक अभिनंदन,” MCA ने X वर पोस्ट केले.

निवडणुकीच्या दिवशी, अजिंक्य यांने MCA साठी आपल्या योजना आणि मुंबईतील क्रिकेटच्या पायाभूत सुविधा कशा सुधारायच्या याबद्दल खुलासा केला. “माझा अजेंडा क्रिकेट आहे. मी सर्व स्टेकहोल्डर्ससाठी काय करू शकतो, मग ते क्युरेटर असो, मग ते क्रिकेटपटू असोत किंवा क्लब असोत. अपग्रेड करणे हे लक्ष्य आहे, त्यासाठी मी जे काही करू शकतो ते मी कारेन,” अजिंक्य यांने गेल्या आठवड्यात सांगितले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img