26 C
New York

School Bus Accident : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली, 6 विद्यार्थी जखमी

Published:

बेळगाव

बेळगावात (Belgaon) एक धक्कादायक घटना घडली आहे. गोकाक तालुक्यात स्कूल बसचा भीषण अपघात (School Bus Accident) झाला आहे. स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाली आहे. तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे. बसचं स्टेअरींग लॉक झाल्यानं अपघात झाला जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोकाक तालुक्यातील गोकाक पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉस येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मावनूर,गोडचीनमलकी आणि मेलमट्टी या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस मरडीमठ गावाकडे निघाली होती.बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. बस उलटल्यावर विद्यार्थी घाबरून गेले आणि त्यांनी एकच आकांत केला. अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्यांना धीर दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img