16.7 C
New York

Aircraft Crashes : काठमांडूमध्ये सौर्या एअरलाईन्सचे विमान क्रॅश

Published:

नवी दिल्ली

नेपाळच्या काठमांडू (Kathmandu) येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Aircraft Crashes) मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सौर्य एअरलाइन्सचे (Saurya Airlines) विमान टेकऑफ दरम्यान क्रॅश झाले आहे,  त्यानुसार 19 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रनवेवरुन घसरलं आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना घडली. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. त्रिभुवन इथून हे विमान पोखरला जात होतं.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौर्य एअरलाईन्सचे विमानाने सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोखराकडे उड्डान भरले होते. मात्र, उड्डाण भरतानाच अचानक विमान क्रॅश झाले. अपघातवेळी विमानात क्रू मेंबर्ससह 19 जण प्रवास करत असल्याचे वृत्त नेपाळच्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img