23.1 C
New York

Ravikant Tupkar : स्वाभिमानीतून हकालपट्टी, तुपकरांची नव्या पक्षाची घोषणा

Published:

पुणे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून (Swabhimani Shetkari Sanghatna) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची हाकालपट्टी करण्यात आल्यानंतर आज पुण्यात पत्रकार परिषद घेत रविकांत तुपकर यांनी मोठी घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नवीन पक्ष म्हणून महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची (Maharashtra Krantikari Aghadi) घोषणा केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने रविकांत तुपकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आली होती. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा करत आगामी विधानसभा निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 6 जागांचा समावेश आहे.

रविकांत तुपकर म्हणाले, स्वाभिमानीने परवा जो धक्कादायक निर्णय माझ्या विरोधात घेतला आणि मला संघटनेपासून मला वेगळं केलं तसेच राजू शेट्टी यांनी जी भूमिका घेतली ती ऐकून मला धक्का बसला आहे. आज आमची 4 तास चर्चा झाली असून आम्ही काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. अनेक वेळा मी जेल मध्ये गेलो, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. २००७ मध्ये आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत आलो तेव्हा संघटना कोल्हापूर पर्यंत मर्यादित होती. आज संघटना नाव रूपाला आली आणि माझी गरज संपली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img