21 C
New York

Pooja Sawant Romantic Reel With Husband: नवऱ्यासह डान्स करत पूजा सावंतने परदेशातून केला रोमँटिक व्हिडिओ शेअर

Published:

Pooja Sawant Romantic Reel With Husband: संपूर्ण महाराष्ट्र ‘कलरफुल’ या अभिनयाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला (Pooja Sawant) ओळखलं जातं. आपल्या सहज, सुशील, सुंदर अशा अभिनयाने तिने प्रत्येकाचंच मन जिकलं. ‘दगडी चाळ’ या चित्रपटामुळे पूजा सावंत सर्वांच्या घराघरांत लोकप्रिय झाली. पूजा सावंतचा आजच्या घडीला चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पूजाने वैयक्तिक आयुष्यात रुपेरी पडद्यावर यश मिळाल्यावर यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लग्नगाठ बांधली. पूजाचा लग्नसोहळा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने मुंबईमध्ये पार पडला. पूजाच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

Pooja Sawant Romantic Reel With Husband: गश्मीर महाजनी व त्याची पत्नी, प्रार्थना बेहेरे, वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान, सुखदा खांडकेकर हे पूजाचे इंडस्ट्रीमधील फार जवळचे मित्र आहेत. या सर्वानीच पूजाच्या लग्नात धमाल केल्याचं पाहायला मिळालं. अशातच अभिनेता भूषण प्रधानचा (Bhushan Pradhan) एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे लाडक्या आणि जवळच्या मित्रासाठी पूजाने रोमँटिक डान्स करतानाचा व्हिडीओ खास तिच्या पतीबरोबर शेअर केला आहे.

Pooja Sawant Romantic Reel With Husband: ‘घरत गणपती’ (Gharat Ganpati) चित्रपटातील गाण्यावर पूजाने आपल्या नवऱ्यासह अगदी रोमँटिक डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटात भूषण प्रधान मुख्य भूमिकेत पहियाला मिळणार आहे. पूजा व तिचा नवरा सिद्धेश यांचा हा सुंदर रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पूजाने हा व्हिडीओ परदेशात शूट केल्याचं लोकेशन पाहून स्पष्ट होत आहे.

 लेकीला चित्रपटात घेतलं अन् सुनील शेट्टीने केला दिग्दर्शकाला थेट बंगलाच गिफ्ट;

पूजा व तिच्या पतीची भूषणसाठी खास पोस्ट
भूषणला येणाऱ्या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी पूजा व तिच्या नवऱ्याने हा डान्स जोडीने केला आहे. अभिनेत्रीने याबद्दल लिहिलं, या गाण्यावर माझ्या जवळच्या व्यक्तीसोबत डान्स करण्यासाठी मी खूप वाट पाहिली आहे. सिद्धेश आणि माझ्याकडून ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा! भूषण तुला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा कारण, मला माहितीये तू नेहमीच सगळं उत्तम करतो. येत्या २६ जुलैला ‘घरत गणपती’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय तर, नक्की पाहा असं कॅप्शन देत पूजाने आपल्या मित्राला चित्रपटासाठी छान शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, या व्हिडिओवर सुखदा खांडकेकर, पूजाचा भाऊ श्रेयस आणि बऱ्याच नेटकऱ्यांनी पूजा आणि तिच्या नवऱ्याच्या या रील व्हिडिओचा रोमँटिक अंदाज पाहून व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img