मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा भारतीय क्रिकेट संघातील अव्वल वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो परंतु त्याचा प्रवास आव्हानांशिवायच नव्हता. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या मागील तीन आवृत्त्यांमध्ये तो भारताचा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज आहे. शमी नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे.
कौटुंबिक हिंसाचारासाठी शमीच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पत्नी हसीन जहाँसोबत विभक्तही तो झाला. एका पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेऊन शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोपही करण्यात आला परंतु हे या आरोपांमध्ये काहीच तथ्य नव्हते हे नंतर समोरही आले. शमीच्या मित्रानेै उमेश कुमारने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर खुलासा केला की शमीने त्यावेळी आत्महत्येचा विचार केला होता.
शमीने बऱ्याच वेळा मैदानावर आणि मैदानाबाहेर आव्हानांचा सामना केला आहे. वारंवार होणाऱ्या दुखापती व त्याच्या माजी पत्नीशी संबंधित वैयक्तिक समस्या आणि त्याच्या विभक्त पत्नी हसीन जहाँनचे मॅच फ़िक्सिन्गचा त्रासदायक आरोपांशी तो संघर्ष करत आहे. हसीन जहाँनने शमीवर डोमेस्टिक व्हायलन्सचा आरोप केला होता, ज्यामुळे BCCI ने करार तात्पुरता रद्द केला होता. हा काळ शमीसाठी भरपूर संघर्ष व त्रासाचा होता, ज्यामुळे त्याला स्वतःचे आयुष्य संपवण्याचे विचार केला होता. शमीने आत्महत्येच्या त्याच्या विचारांबद्दल खुलेपणाने चर्चा केली, आणि त्याचा मित्र उमेश कुमार याने त्याच्या निराशेच्या खोलवर प्रकाश टाकला आहे.
“त्या टप्प्यात शमी सर्व गोष्टींशी लढत होता. तो माझ्या घरी माझ्यासोबत राहत होता. पण जेव्हा पाकिस्तानवर फिक्सिंगचे आरोप झाले आणि त्या रात्री त्याची चौकशी झाली, तेव्हा तो तुटून पडला. तो म्हणाला की सर्व काही सहन करू शकतो पण माझ्या देशासोबत विश्वासघाताचा आरोप मी सहन नाही करू शकत,” उमेश शुभंकर मिश्राच्या पॉडकास्ट ‘अनप्लग्ड’ वर म्हणाले.
“त्या रात्री त्याला काहीतरी कठोर करायचे होते अशी बातमी देखील आली. मी पाणी प्यायला उठलो तेव्हा पहाटे 4 वाजले होते. मी किचनमध्ये जात असताना मला तो दिसला आणि तो बाल्कनीत उभा होता. मला समजले की ती रात्र शमीच्या वैयक्तिक जीवनातली सर्वात मोठी रात्र होती. एक दिवशी आमची चर्चा चालू होती तेव्हा आम्हाला या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीकडून फोन आला आणि त्यांनी सांगितले की शमीला क्लीनचिट मिळाली आहे. ही बातमी ऐकून शमीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि सुटकेचा निश्वास दिसत होता व ते त्याच्यासाठी विश्वचषक जिंकण्यापेक्षाही आनंदाच होतं.