जालना
नाट्यनिर्मात्यांच्या फसवणूक प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुनावणीला हजर न राहिल्यानं जरांगे पाटील यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. मनोज जरांगेंसह दोघांविरोधात अजामीनपात्र वॅारंट जारी (Non Bailable Warrant) करण्यात आलं आहे. पुणे सत्र न्यायालयानं (Pune Sessions Court) हा वॉरंट बजावला आहे.
जरांगे पाटील यांच्यासह अर्जून जाधव आणि दत्ता बहिर यांनी नाटकाचं प्रयोग आयोजित करून नाट्यनिर्मात्याला त्याचे पैसे न दिल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे. मात्र पाटील या सुनावणीसाठी हजर राहिले नव्हते. त्यामुळे मनोज जरांगेंविरोधात पुणे कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आली आहे. या आधी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट जारी केले होते. 30 मे 2024 या दिवशी वॉरंट रद्द करताना न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना 500 रुपयाचा दंड ठोठावला होता. 2013 मध्ये एका गुन्ह्यात मनोज जरांगेंविरोधात वॉरंट जारी झालं होतं. जामीन देताना घातलेल्या अटी न पाळल्यानं आज पुन्हा वॅारंट जारी करण्यात आलं आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.