21 C
New York

Lonavala Rain : लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसामुळे सखल भाग जलमय

Published:

लोणावळा

पुण्यातील लोणावळा (Lonavala Rain) परिसरात तुफान पाऊस बरसत (Heavy Rain) आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने (Lonavala Cloud Burst) सखल भागात पाणी साचलं आहे. या पाण्यामुळं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले. त्यातील 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं आहे. या पर्यटकांना शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे. चोवीस तासांत या मोसमातील उच्चांकी पाऊस बरसला आहे. तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

लोणावळा आणि परिसरात तुफान पाऊस बरसतोय, ढगफुटी सदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचलं आहे. याच पाण्यामुळं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. पैकी 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे, उर्वरित पर्यटकांना ही काही वेळातच बाहेर काढण्यात येईल. हे सगळे पर्यटक बंगल्यात बसले होते, मात्र बाहेर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याची कल्पना यांना नव्हती. बाहेर येऊन पाहिलं असता चहुबाजूंनी पाणी झाल्याचं दिसून आलं. आता या सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img