3 C
New York

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’साठी आता ‘हे’ 6 नवे बदल

Published:

मुंबई

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) आता पुन्हा एकदा काही बदल करण्यात आले आहेत. महायुती (MahaYuti) सरकारची ही महत्वकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळाला असा सरकारचा प्रयत्न आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लाडकी बहिण योजनेत आता 6 नवे बदल करण्यात आले आहेत.

अर्ज करताना काही अडचणी येत होत्या. त्यात सुलभता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विशेष करून नवविवाहीत महिलांना विवाह नोंदणीवरून अडचण येत होती. त्यामुळे अर्ज करण्यात अडचण येत होती. याची दखल सरकारने घेतली आहे. त्यानुसार कॅबिनेटमध्ये निर्णय घेवून सहा नवीन अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता लवकरच शासन निर्णय काढला जाणार आहे. या बदला मुळे अर्ज करणे पूर्वी पेक्षा अधिक सुलभ होईल असा सरकारचा विश्वास आहे. नव विवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य होत नाही. अशा वेळी त्या महिलेच्या पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. शिवाय गाव स्तरावर प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादीचे सार्वजनिक वाचन केले जाईल. 

लाडकी बहिण योजनेतील 6 नवे बदल 

1) पोस्ट बँक खाते असल्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरणार
2) दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्रातल्या पुरूषा बरोबर लग्न केल्यास पतीच्या कागदपत्रावर तिला लाभ मिळेल 
3) गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार, त्यात बदलही केले जाणार 
4) केंद्राच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही यापुढे लाभ मिळणार  
5) नवविवाहीत महिलेची नोंदणी शक्य नसेल, तर पतीचे रेशनिंग कार्ड ग्राह्य धरणार 
6) ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img