Rainy Season Clothes Bad-Smell: पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाळ्यामध्ये सगळ्याच गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. उदा, आरोग्याची, त्वचेची, केसांची, पण तुम्हाला हे माहितेय का, या सगळ्या गोष्टींसोबतच आपल्याला कपड्यांची सुद्धा काळजी घेणं फार महत्वाचं आहे. पावसाळ्यात आपले कपडे न सुकणे, ओले राहणे ही समस्या तर सामान्यच आहे. प्रत्येकांच्याच घरामध्ये पावसाळ्यात कपडे पाहिजे तसे वाळत नाहीत. त्याच्यामुळे कपड्यांचा एक आंबट, कुबट वास येतो. अशाप्रकारे कपड्यांचा वास आल्याने अंगात ते कपडे परिधान करावेसे वाटत नाहीत.
Rainy Season Clothes Bad-Smell: पावसाळ्यात सर्वानाच या समस्येचा प्रत्येकाच्या घरी त्रास होतो. कपडे सुकण्यासाठी आपण ३-३ दिवस लावतो की, आज सुकत नाही तर उद्या सुकतील असं आपलं चालूच असतं. अशातच, ओले आणि आंबट तसंच कुबट वास येणारे कपडे परिधान केल्याने सारखं त्याच वासाने आपलं डोकं ठणकावत असतं. याशिवाय त्या कपड्यावर बॅक्टेरिया सुद्धा तयार होतात. असे वास येणारे कपडे परिधान केले की त्वचेशी निगडित काही समस्या उद्भवतात. याच्यामुळेच आज या माहितीमधून कपडे वाळवण्याच्या काही सिंपल टिप्स, तसेच कपड्यानां वास येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
या पावसाळ्यात मुलांना व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी या 5 प्रभावी टिप्स
लिंबाचा रस
कपड्यांचा आंबट वास येऊ नये यासाठी तुम्हाला लिंबाचा रस खूप उपयुक्त ठरेल. कपडे धुवून झाल्यानंतर एक बादली पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या. यानंतर त्यामध्ये वॉश केलेले कपडे टाका. कपड्याना या पाण्यात छान भिजून घ्या. नंतर कपडे पिळून घ्या. कपड्यांमध्ये लिंबाचा रस पसरल्याने कपड्यांचा वास येत नाही, आणि बॅक्टेरीया सुद्धा कपड्यांमध्ये जमा होत नाही. त्यामुळे कपड्यांमध्ये लिंबाचा रस चांगला मिसळा.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
कपड्यांमध्ये येणार कुबट आणि आंबट वास बंद होण्यासाठी त्याच्यामध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा चांगल्या प्रकारे मिक्स करा. ही पद्धतसुद्धा कपडे वॉश करून झाल्यानंतर करायची आहे. याच्यासाठी एका बकेट्मधे बेकिंग सोडा व व्हिनेगर मिक्स करा त्यात कपडे भिजवून ठेवा. असं केल्याने कपड्यांमध्ये वास सुरू होतो.
फॅन सुरू ठेवा
पावसामध्ये बाहेर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पाहिजे तसा सूर्यप्रकाश येत नाही. त्यामुळे आपण घरच्या घरी कपडे सुकण्यासाठी ठेवतो. अशावेळी तुम्हाला घरीच कपडे सुकण्यासाठी ठेवायचे असतील तर त्यासाठी जागा मोकळी असली पाहिजे. घरातील पंखा बंद ठेऊ नका. कपडे सुकण्यासाठी पंखा सुरूच ठेवा. त्यामुळे तुमचे कपडे लवकरात लवकर वाळतील आणि खराब वास देखील येणार नाही.
रोजच्यारोज कपडे धुवा
आपण आपले रोजचे कपडे रोजचं धुतले पाहिजेत. कारण कपडे दररोज न धुता जर जास्त साठवून ठेवल्यास कपड्यांचा ढीग एकाच दिवशी जास्त पडतो. एकाच दिवशी जास्त कपडे असल्यास ते लगेच सुकत सुद्धा नाहीत. शिवाय त्यांना सुकवण्यासाठी घरात जागा कमी पडते. त्यामुळे खूपच गिचमिड करून आपण कपडे सुकत टाकतो. त्यामुळे हवा लागत नसल्यामुळे कपड्यानां वास येण्यास सुरुवात होते.