मुंबई
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुख यांच्यावर उद्धव ठाकरे, अनिल परब, अजित पवार, आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये टाकण्याकरिता काही प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आला असा धक्कादाय खुलासा केला होता. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिउत्तर दिले आहे
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी कुणाच्या नादी लागत नाही जर माझ्या कुणी नादी लागलं तर मी त्यांना सोडत नाही श्याम मानव यांनी सुपारी घेणाऱ्यांच्या नादी लागणार का असा सवाल देखील फडणवीस यांनी विचारला आहे. अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करावे याकरिता दबाव टाकला होता असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्याम मानव इतके वर्ष मला ओळखतात. त्यांनी अशा प्रकारे आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. मला असं वाटतं इको सिस्टममध्ये आता सुपारीबाज लोकं घुसले आहे. सुपारी घेऊन बोलणारे लोकं घुसले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागले का. एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा महाविकासआघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्या समोर लागल्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करायला लावला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. ते काय सुटले नाहीत. ते जामिनावर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीयेत. १०० कोटीच्या वसुली केसमध्ये ते बेलवर बाहेर आहेत. ते सातत्याने आरोप करताय मी शांत आहे. मी अशा प्रकारे राजकारण करत नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी स्पष्टपणे सांगतो कारण त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे काही ऑडिओ व्हिजवल मला आणून दिले आहेत. त्यात ते शरद पवार, उद्धव ठाकरे, वाझेवर काय बोलताय ते सगळं माझ्या कडे आहे. माझ्यावर वेळ आली तर मी ते सार्वजनिक करेल. रोज जर कोणी खोटं बोलून नरेटिव्ह सेट करत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावे मी पुराव्य़ा शिवाय काहीही बोलत नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे यांची केस २०१३ ची केस आहे. यापूर्वी आधीच त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट निघतं. पण तारखेवर हजर राहिलं तर ते रद्द होते. पुन्हा ते तारखेवर गेले नाही तर त्यांचा वॉरंट रद्द होईल. आमचा त्यात काहीही संबंध नाही. मी त्यांना दोष देणार नाही. उपोषणाच्या शेवटी ते माझ्य़ा आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली होती. उपोषणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता असं त्यांनी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीसला टार्गेट करुन कोणाला फायदा आहे. फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटते. असं त्यांनी शेवटी म्हटले आहे.