8.7 C
New York

Union Budget : मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात झाल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Published:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागंल आहे. यावेळी सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्याही योजनेसाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांचे अर्ज देण्यात येईल.

  • शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर सवलत

 केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ई-व्हाऊचर दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या 3% वार्षिक व्याज सवलतीसाठी थेट दिले जातील.

  • रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपये

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ उत्कृष्ट आहे. भारताची चलनवाढ स्थिर राहून ४% च्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रित केले जात आहे. रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे बजेट आहे.

बजेटपूर्वीच शेअर बाजारात उसळी

  • कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

 अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. संसदेत त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, “भारतातील जनतेनं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. ऐतिहासिक तिसऱ्यांदा त्यांची पुन्हा निवड झाली आहे. कठीण काळातही भारताची अर्थव्यवस्था दमदार कामगिरी.”

  • अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद

बिहारमधील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. बिहारमध्ये 21 हजार कोटी रुपयांच्या पॉवर प्लांटचीही घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय बिहारला आर्थिक मदत मिळणार आहे. आंध्र प्रदेशला सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.

  • सरकार भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना आणणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची घोषणा केली जात आहे. सरकार राष्ट्रीय सहकार धोरण आणणार आहे. त्याच वेळी, सरकार भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना आणणार आहे.

  • महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद

महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जातील. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाईल. विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी क्षेत्र आणि हैदराबाद-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील ओरवाकल क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिला जाईल.

  • EPFO मध्ये प्रथमच नोंदणी करणाऱ्या लोकांना 15 हजार रुपये मिळणार

प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांसाठी, पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास EPFO ​​मध्ये पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची मदत मिळेल.

  • उच्च शिक्षणात सरकारकडून मिळणार मदत

रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतुद करण्यात आली आहे. देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख कर्जावर सरकारकडून मदत देण्यात येईल.

  • बजेटमध्ये तरुणांसाठी काय? ५ वर्षांच्या काळात २० लाख युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण दिलं जाईल
    5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप, 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील.
    MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होतील, PSU बँकांनी अंतर्गत मूल्यांकनानंतर MSME ला कर्ज द्यावे,
    MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
    देशात उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा
    पहिल्या कामावर थेट EPFO ​​खात्यात 15 हजार रुपये दिले जातील
  • ‘500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधीसाठी योजना सुरू करणार’

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘सरकार 500 शीर्ष कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी देण्यासाठी एक योजना सुरू करणार आहे. यामध्ये 5000 रुपये प्रति महिना इंटर्नशिप भत्ता आणि 6000 रुपये एकरकमी मदत दिली जाईल.

बातमी अपडेट होत आहे…

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img