पुणे
गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा पुणे (Pune) जिल्ह्यातील ससून रुग्णालय (Sassoon Hospital) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या रुग्णालयात एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी ससूनवर गंभीर आरोप केले आहे. रात्रीच्या वेळी ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना निर्जनस्थळी सोडून येतात. असा गंभीर आरोप वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी केला आहे. या आरोपावरून येरवडा पोलिस ठाण्यात ससूनमधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दादासाहेब गायकवाड बेवारस रुग्णांची सेवा करतात. ससून रुग्णालयात रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते दाखल करतात. त्यांनी दीड वर्षापूर्वी एका बेवार रुग्णाला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते आणि दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेले असता तो रुग्ण गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्या रुग्णाला डॉक्टर रात्री घेऊन गेले होते तसेच बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार रुग्णालयात सुरु आहे. अशी माहिती त्यांना मिळाली.