16.7 C
New York

NEET UG 2024 : नीट-यूजी फेरपरीक्षा होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Published:

नवी दिल्ली

NEET परीक्षेत झालेल्या (NEET UG 2024) घोळाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षा पुन्हा घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. परीक्षा पुन्हा घेतली तर त्याचे मोठे परिणाम होतील, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. 

सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, परीक्षेचे पावित्र्य भंग झाल्याचे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. या वर्षासाठी NEET UG फेरपरीक्षा घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. जे या परीक्षेला बसणाऱ्या 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडेल आणि प्रवेश प्रक्रियेत देखील व्यत्यय निर्माण होईल.

भविष्यात वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमावर आणि भविष्यातील डॉक्टरांवर त्याचा मोठा परिणाम होईल.वैद्यकीय शिक्षणात जागा वाटपात आरक्षण ठेवण्यात आले आहे, त्यांच्यासाठी देखील हे हानिकारक ठरेल, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img