केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज सलग सातव्या (Budget 2024) वेळेस अर्थसंकल्प सादर केला. केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा (NDA Government) हा पहिलाच अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सितारमण यांनी कृषी, अर्थ, आरोग्य, उद्योग, टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या. नोकरदार मंडळींना दिलासा देत तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. देशात महामार्गांचं जाळं, नवीन विद्यापीठांचं बांधकाम, पर्यटन उद्योगाला बूस्टर, शेतीसाठी दीड लाख कोटींची तरतूद अशा महत्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या अर्थसंकल्पाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
मोदी म्हणाले, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं ही आमच्या सरकारची ओळख राहिली आहे. आजच्या अर्थसंकल्पामुळे त्याला बळकटी मिळाली आहे. एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेटिव्हची घोषणा सरकारने केली आहे. याद्वारे पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या युवकांचा पहिला पगार आमचं सरकार देणार आहे. देशातील एक कोटी युवकांसाठी इंटर्नशीप योजना सुरू केली आहे. या युवकांसाठी नव्या शक्यतांचे दरवाजे उघडले जातील.
अर्थसंकल्पाबाबत अजित पवारांचे मोठे विधान..
आजचा अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक वर्गाला ताकद देणारा ठरणार आहे. मागील दहा वर्षांच्या काळात देशातील 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. हा अर्थसंकल्प नव युवकांना अगणित संधी देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देशातील लहान व्यापारी, लघु उद्योगांना प्रगतीचा नवा मार्ग दिसेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
Narendra Modi तीन लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त
कर रचनेतील नव्या बदलानुसार तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. तीन ते सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर द्यावा लागेल. सात लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर द्यावा लागेल. दहा ते बारा लाख रुपयांच्या उत्पन्नसाठी 15 टक्के कर द्यावा लागेल. 12 लाख ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना 20 टक्के आयकर भरावा लागणार आहे. तसेच ज्या लोकांचे उत्पन्न 15 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.