21 C
New York

Prasad Oak: मराठीमधला Highest Paid आहे ‘हा’ अभिनेता!

Published:

Prasad Oak: मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता म्हणून प्रसाद ओक (Prasad Oak) ला ओळखलं जात. ‘धर्मवीर २’ ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रसाद त्याच्या आगामी विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसाद ओक मराठीमधला सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे का? असा प्रश्न त्याला मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळी प्रसादने दिलेल्या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

प्रसाद सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार?
Prasad Oak: पॉडकास्टच्या मुलाखीदरम्यान प्रसाद म्हणाला, “हाययेस्ट पेड (Highest Paid) अभिनेता असण्यापेक्षा हाययेस्ट व्ह्यूड (Highest viewed) अभिनेता असणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मी हाययेस्ट पेड अभिनेता आहे का हे फक्त माझ्या दोन माणसांना विचारावं.. मंजिरी ओक आणि मंगेश देसाई.. मंजिरी माझा सर्व व्यवहार सांभाळते. तर मंगेश देसाई चित्रपटाचे निर्माते आहेत. ही दोन माणसं याबद्दल नक्की सांगू शकतील. पण हल्ली मला असं वाटतं हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा आपण हाययेस्ट रिड ( Read ) कलाकार आहोत का? आपल्याबद्दल लोक किती वाचतात किंवा हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता आहे का? हे माझ्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं”

रितेश देशमुखने सांगितलं त्याच्या घरातल्या ‘बिग बॉस’ बद्धल,म्हणाला…

प्रसाद ओक एक बहुआयामी कलाकार?
मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या प्रसाद ओक अनेक कमालीच्या भूमिका साकारत आहे. याशिवाय कच्चा लिंबू, चंद्रमुखी, अशा चित्रपटांचं दिग्दर्शन असो किंवा अगदी महाराष्ट्राची हास्यजत्रा मधली त्याची मार्मिक असणारी टिपण्णी असो. प्रसाद हा बहुआयामी कलाकार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्रसाद ओकच्या आगामी ‘धर्मवीर २’ची उत्सुकता प्रेक्षकांच्या शिगेला पोहोचली आहे. आगामी काळात प्रसाद अनेक वैविध्यपूर्ण भूमिका करणार असल्याचं देखील समोर येतंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img