8.7 C
New York

Union Budget : नोकरदारांची चांदी! अर्थमंत्र्यांच्या घोषणेत काय?

Published:

देशात रोजगाराच्या बाबतीत कायमच चर्चा होत असते. आजच्या बजेटमध्ये (Union Budget) सरकारने रोजगाराबाबत मोठी घोषणा केली आहे. रोजगार देणाऱ्या संस्थांना सरकारकडून मदत केली जाणार आहे. तसेच दहा लाख युवकांना ईपीएफओचा (EPFO) लाभ मिळवून देण्याचीही घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्पीय भाषणात केली. इतकेच नाही तर सरकारने अशीही घोषणा केली आहे की जर एखाद्या कंपनीने एखाद्या युवकाला जॉब दिला तर त्या युवकाचा पहिला पगार सरकारकडून दिला जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो रोजगार उपलब्ध होतील असे सांगितले जात आहे.

या योजनेबाबत माहिती देताना सांगण्यात आले की पहिलीच नोकरी करणाऱ्या उमेदवाराला या योजनेचा फायदा मिळेल. पंधरा हजार रुपये ईपीएफओ अकाउंटमध्ये सरकारतर्फे जमा केले जातील. इतकेच नाही तर रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी तीन इंसेटिव्ह स्कीम सुरू करण्यात येतील. मोठ्या कंपन्यात युवकांच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी एक कोटी युवकांना इंटर्नशीप उपलब्ध करून देण्यात येईल. ही इंटर्नशीप एक वर्षाची असेल. या काळात युवकांना दरमहा पाच हजार रुपये देखील मिळणार आहेत. यानंतर या इंटर्नशीप केलेल्या युवकांना देशातील टॉप 500 कंपन्यांत नोकरीची संधी मिळेल.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला

सरकारने स्पष्ट केले आहे की पुढील पाच वर्षांत एक लाख कोटी रुपये रोजगार आणि स्किल उपलब्ध करुन देण्यासाठी खर्च करणार आहे. तसेच दोन लाख कोटी रुपये फक्त रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. पाच वर्षात चार कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अर्थव्यवस्थेत पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नऊ आवश्यक गोष्टींची घोषणा सितारमण यांनी आज केली. यामध्ये प्रॉडक्टिविटी, रोजगार, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, मुलभूत स सुविधा, इनोवेशन आणि सुधारणा यांचा समावेश आहे.

Union Budget तीन लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त

कर रचनेतील नव्या बदलानुसार तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. तीन ते सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर द्यावा लागेल. सात लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर द्यावा लागेल. दहा ते बारा लाख रुपयांच्या उत्पन्नसाठी 15 टक्के कर द्यावा लागेल. 12 लाख ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना 20 टक्के आयकर भरावा लागणार आहे. तसेच ज्या लोकांचे उत्पन्न 15 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img