4 C
New York

Drones : ड्रोन बाबत भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा

Published:

रमेश तांबे, ओतूर

ओतूर पोलीस (Otur Police) ठाण्याच्या हद्दीतील जुन्नर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी अवैध बेकायदेशीर विनापरवाना ड्रोन (Drones) उडवले जाऊन, त्याचा वापर टेहळणी करणे, चोरी करणे, इत्यादी. कामांसाठी केला जात आहे, अशी अफवा काही लोकांकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवली जात आहे.मात्र रात्रीचे वेळी सदर ड्रोन उडवल्यामुळे, उत्तर पुणे जिल्ह्यात अद्याप पर्यंत कोणतीही चोरीची घटना घडली नसून नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नागरिकांनी ड्रोन बाबत भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन जुन्नर उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर व ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी केले आहे.

तसेच विनापरवाना अवैधरित्या रात्रीचे वेळी ड्रोन उडताना आढळल्यास, जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ नंबर डायल करून माहाती द्यावी,तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पाठवले जातील.तसेच अवैद्य,बेकायदेशीर व विनापरवानगी ड्रोन उडवताना कोणताही संशयित इसम नागरिकांना मिळून आल्यास त्यास मारहाण न करता पोलीसांच्या ताब्यात द्यावे.त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील तसेच जुन्नर तालुक्यातील सर्वच ड्रोन धारकांनी त्यांची माहिती व ( डीजीसीए )ची परवानगी असले बाबतचे सर्टिफिकेट हे जवळच्या पोलीस ठाण्यात तात्काळ जमा करावे. तसेच विनापरवाना कोणत्याही कार्यक्रमांमध्ये ड्रोन उडवू नये.सदर बाबींचे पालन न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरीकांनी खात्री न करता कोणतीही माहिती वॉटअप व इतर सोशल मिडियावर पाठवून आफवा पसरू नये,अफवा पसरल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

याबाबत ओतूर,आळेफाटा,नारायणगाव,जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील,सरपंच यांच्याबरोबर मीटिंग घेऊन, त्यांना देखील योग्य ते सूचना दिलेल्या आहेत.तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावामध्ये ग्रामसुरक्षा दल ॲक्टिव करून, कुणी व्यक्ती ड्रोन उडत असेल किंवा संशयास्पद असल्याचे निदर्शनात आली तर त्या व्यक्तीस मारहाण न करता, कायदा हातात न घेता त्याला पोलिसांच्या स्वाधीन करावे रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img