Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता लागून होती होती. अखेर काही दिवसांपूर्वीच ‘कलर्स मराठी’ वाहिनीकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदा २८ जुलैपासून ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू होणार आहे. यावर्षी या शोमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामधला सर्वात मोठा बदल म्हणजे या सीझनचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) करणार आहे. बिग बॉसच्या आधीच्या चार सिझनची धुरा ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी सांभाळली होती. आता रितेश देशमुख पाचव्या सीझनची पहिल्यांदाच जबाबदारी निभावणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत संवाद साधताना रितेशने बऱ्याच गोष्टींबद्धल खुलासा केला आहे.
Bigg Boss Marathi Season 5: रितेश म्हणाला, “‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss ) या शोचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे ही संधी मला दिल्याबद्दल सर्वप्रथम मी कलर्स मराठी वाहिनीचे खूप आभार मानतो. मला या शोबद्दल विचारल्यावर माझी पहिली हीच प्रतिक्रिया होती की, ‘केव्हा लाँच होईल हा शो?’ कारण, बिग बॉस होस्ट करण्याची माझी मनापासून इच्छा होती. मी या शोचा फॅन होतो, त्यामुळे संधी मिळाली तसा लगेच मी होकार सांगितला. माझ्या २-३ शूटच्या काही तारखा देखील मी बदलल्या होत्या. हा शो यंदा होस्ट करण्याची संधी मिळाली यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे.”
Bad Newz बॉक्स ऑफिसवर ठरला Good News देणारा चित्रपट
Bigg Boss Marathi Season 5: “बिग बॉस मराठी सीझन पाचवा या शोमध्ये यावर्षी नक्की कोणते स्पर्धक येणार आहेत हे मला सुद्धा नाही माहिती. मी सध्या फक्त टीमबरोबर होस्टिंगची तयारी करतोय. मला नवनवीन गोष्टी नेहमीच करायला आवडतात. आयुष्यात मला बऱ्याच संधी मिळाल्या आहेत आणि मी प्रत्येक ठिकाणी माझे शंभर टक्के दिले आहेत. सध्या माझ्या आयुष्यात ‘बिग बॉस’ होस्ट करतोय ही सर्वात मोठी गोष्ट आहे” असं रितेशने सांगितलं.
तुमच्या घरातील बिग बॉस कोण?
“तुमच्या घरातील बिग बॉस कोण?” असा प्रश्न विचारल्यावर रितेश म्हणाला, “माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या घरात एकच बिग बॉस असतो…तो बॉस म्हणजे त्याची बायको. माझी मुलं बिग बॉस शो बघत नाहीत कारण, त्यांच्यासाठी घरात घडतं तेच बिग बॉस असतं आणि जिनिलीया बद्दल सांगायचं झालं तर, माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडली तर मी सर्वात पहिलं तिलाच सांगतो. तिचं मत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मी बिग बॉस करायला पाहिजे ही तिची मनापासून इच्छा होती कारण, आम्ही दोघंही बिग बॉस शोचे खूप मोठे फॅन आहोत.”