21 C
New York

Heavy Rain : सावधान! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

Published:

राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस (Weather Update) होत आहे. पुढील काही दिवसांत पावसाची अशीच शक्यता राहणार आहे. हवामान विभागाने पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. मुंबईला तर पावसाने झोडपून (Mumbai Rains) काढले आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आता पुढील तीन दिवस पाऊस राहणार असल्याचा (Heavy Rain) अंदाज आहे. हवामान विभागाने तेरा जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात पावसाचा जोर कमी राहिल. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.

उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने आज रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनानेही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोणत्या मुलींना मोफत उच्चशिक्षण मिळणार?

Heavy Rain मुंबई पुण्यात जोर’धार’

हवामान विभागाने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार असून जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मागील पंधरा दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र या आठवड्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. सरासरी हजार मिमीचा टप्पा मुंबईतील पावसानं ओलांडला आहे. तर, अवघ्या 14 दिवसांत जुलै महिन्याची सरासरी पूर्ण करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img