4.1 C
New York

Breastfeeding Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या पालकांनी बाळाच्या स्तनपानाकडे करु नका दुर्लक्ष

Published:

Breastfeeding Tips For Working Women: अनके वेळा पालकांना प्रसूतीनंतर काही दिवसांच्या सबॅटिकलनंतर किंवा रजा किंवा पुन्हा कामावर रुजु व्हावे लागते. परंतु अशा पालकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कार्यलयात आणि घरी तुमच्या कामाचा समतोल राखण्याबरोबरच आपल्या बाळाकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक असते. पालकांनी कामावर रुजु होण्यापुर्वीच यासाठी काय तयारी करता येईल. याविषयी या लेखाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या टिप्स आहेत जाणून घेऊया.

मध, तुळशीचं पान आणि ‘या’ मसाल्याची पावडर मिसळा! सर्दी खोकला जाईल पळून

  1. पुन्हा कामावर रुजू होण्यापूर्वी मदतनीस शोधा:
    Breastfeeding Tips For Working Women: कामावर गेल्यावर तुमच्या बाळाची काळजी कोण घेईल? बाळाची काळजी घेण्यासाठी घरात विश्वासार्ह आणि प्रशिक्षित मदतनीसाची गरज असते. तिला बाळाला आंघोळ घालणे, त्याला/तिला खाऊ घालणे, झोपविणे आणि बाळाला त्रास होत असल्यास काय करावे याबद्दल पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे.
  2. कार्यालयीन वेळेनंतर पूर्णपणे बाळावा वेळ द्या:
    जर तुम्ही तुमचे काम पुन्हा सुरू केलं असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की पूर्वीसारखे तुम्ही कामावतिरिक्त वेळ घालवू शकणार नाही, वेळीच घरी पोहोचाल याची खात्री करा, बाळाला जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तुम्ही सोबत असाल याची खात्री करा.
  3. बाळासोबत पुरेसा वेळ घालवा:
    हे तुम्हाला तुमच्या बाळासोबतचे नाते घट्ट करण्यास मदत करेल.
  4. ब्रेस्ट पंप वापरा:
    चांगला ब्रेस्ट पंप विकत घेणं आणि त्याचा वापर करुन बाळाला आईचे दुध देण्याचा प्रयत्न करा. पंपिंगमुळे दूध येण्यासही मदत होईल. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यासंबंधित सर्व शंका दूर करू शकता.
  5. बाटलीने दूध पिण्याची सवय लावा:
    जर तुम्ही काम सुरू करण्याचा निर्णय पुन्हा घेतल्यावर बाळाला बाटलीतून दूध पिण्यास प्रोत्साहन द्या. केवळ आईच्या दुधावरच बाळ अवलंबून राहता कामा नये. बाटलीचे दुध द्यायला सुरु करा जेणेकरुन बाळाला त्याचा आधार राहिल.
  6. काही दिवस घरून काम करण्याचा प्रयत्न करा जेणेकरुन तुम्ही बाळाची पुरेशी काळजी घेऊ शकाल आणि त्याचा होणारा विकास तुम्ही स्वतः अनुभवू शकाल.
  7. एक योग्य दिनचर्या आखणे गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या बाळाला कळेल की तो/ती तुम्हाला कधी भेटेल. सुट्टीच्या दिवशी बाळाला भरवा, त्याची अंघोळ घाला, कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा.
  8. कामावरून परतल्यानंतर बाळासोबत किमान एक किंवा दोन तास वेळ घालवा. कामावरून परतल्यानंतर केवळ घरगुती कर्तव्ये पार पाडत बसु नका. तुम्हाला तुमच्या बाळालाही तितकाच वेळ द्यावा लागेल.
  9. बाळाच्या दैनंदिन दिनचर्येची नोंद ठेवून बाळाला पुरेसे पोषण मिळत असल्याची खात्री करून घ्या. तुमच्या बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीलाही हे सर्व महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवण्यास सांगा अथवा त्याविषयी माहिती द्या ते तुमच्यासाठी सोयीस्कर होईल.
  10. डॉक्टरांसोबत नियमित संपर्कात रहा. बाळाचे लसीकरणाचे वेळापत्रक चुकवू नये.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img