8.7 C
New York

Heavy Rain : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा ‘धुमधडाका’

Published:

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हाहाकार उडवलाय. संततधार पावसामुळं महाबळेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय. बिरमणी-महाबळेश्वरकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ६ टीएमसीनं वाढ झालीय. सातारा – जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने धुमाकूळ घातलाय. पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथे चोवीस तासात विक्रमी ६५७ मिलीमीटर पाऊस झालाय. संततधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून कोयना धरणात प्रतिसेकंद ७० हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

Heavy Rain कोयना, कृष्णा नद्या धोका पातळीकडे

संपूर्ण जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार रविवारी दिवसभर मुसळधार पाउस झाला. रात्रभर पावसाचा जोर होता. त्यामुळे नद्यांना पुराचे पाणी वाढलं आहे. सध्या नद्यांच्या पुराची धोका पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून शेतांची तळी झाली आहेत.

मुसळधार पावसाचा तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवेवर परिणाम

Heavy Rain कोयना धरणातील पाणीसाठा ६० टीएमसी

संततधार पावसामुळं कोयना धरणात प्रतिसेकंद ७० हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चोवीस तासात ६ टीएमसीने वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता धरणातील पाणीसाठा ६०.४२ टीएमसीवर पोहोचला आहे. पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून लवकरच पाणी सोडलं जावू शकतं.

Heavy Rain महाबळेश्वरात सर्वाधिक २४५ मिलीमीटर पावसाची नोंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वरमध्ये चोवीस तासात सर्वाधित २४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगरमध्ये १७६ मिलीमीटर आणि नवजा येथे २३६ मिलीमीटर पाऊस झालाय. पाटण तालुक्यातील मराठवाडी आणि जावली तालुक्यातील महू धरणांच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img