23.1 C
New York

Sushma Andhare : ठाकरेंवरील अमित शाहांच्या आरोपांना सुषमा अंधारेंकडून प्रत्युत्तर

Published:

पुणे

पुण्यात रविवारी भाजपच्या (BJP) प्रदेश अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख बनले आहेत असे अमित शहा म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्हाला अमित शहा यांच्यावर बोलायचे नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत आम्ही काय आहोत? याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. आमचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपराकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. अमित शहा यांनी पुण्यात येऊन जी मुक्ताफळ उधळली आहेत, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, अमित शाह यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपले भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावे लागत आहे. त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरूवात करता येत नाही आणि भाषण संपवता ही येत नाही. अमित शहा यांनी भाषणावेळी ज्या भाषेचा वापर केला, ते दुर्दैवी आहे असा हल्ला सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी खोचक शैलीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या दोघांची जन्म तारीख 1 एप्रिल असावी, त्यांच्या वागण्यातून ते दिसतं. फडणवीस गृहमंत्री आहे की ठोक मंत्री आहेत. कुंपणच शेत खात असेल तर कसं होणार, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img