पुणे
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढलेले रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची शेतकरी स्वाभिमान संघटनेतून (Swabhimani Shetkari Saghtana) हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी काम केल्या प्रकरणी शिस्तभंग समितीने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर तिसरी आघाडी सामील होणार असल्याची चर्चा होती.
गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेपत शिस्तभंग समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष जालिंदर जाधव तसेच पक्षाचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…