Ranbir Kapoor: बॉलीवूडचा चॉकलेट बॉय आणि लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) २००७ साली ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. रणबीरचा हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला मात्र रणबीरच्या अभिनयावर चाहते फिदा झाले. रणबीर कपूरने त्यांच्या कमालीच्या करिअरमध्ये ‘बर्फी’, ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’, ‘ये जवानी है दिवानी’,’अॅनिमल’ असे अनेक हिट चित्रपट दिले. याबरोबरच रणबीर कपूरचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिलं. एकापेक्षा एक टॉपमधल्या अभिनेत्रींसोबत त्याच रिलेशन गाजलं. त्यामुळे त्याला ‘कॅसेनोव्हा’,’चीटर’ असा टॅग लागला. याचं दु:ख त्याने स्वतः व्यक्त केलं आहे.
Ranbir Kapoor: एका पॉडकास्टमध्ये रणबीर कपूरने नुकतीच हजेरी लावली होती. रणबीर म्हणाला, “मी सर्वात टॉपच्या दोन अभिनेत्रींना डेट केलं आणि हीच माझी ओळख बनली. ‘कॅसेनोव्हा’ हा टॅग माझ्यावर लागला. आयुष्यातल्या एका मोठ्या पार्टसाठी मला धोखेबाजचा टॅग मिळाला जो अजून सुद्धा आहे. मी याच टॅगसोबत आयुष्यभर जगलो आणि अजूनही जगतो आहे.”
पुन्हा खळखळून हसायला व्हा सज्ज…‘नवरा माझा नवसाचा २’ येतोय ‘या’ दिवशी!
Ranbir Kapoor: या ‘कॅसेनोव्हा’ टॅगचा रणबीरवर किती परिणाम झाला आणि अजूनसुद्धा होतोय याचंसुद्धा उत्तर पॉडकास्टमध्ये आहे. अशातच, करिअरच्या सुरुवातीला रणबीरने दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) डेट केलं. काही काळानंतर हे नातं टिकलं नाही. काही वर्षानंतर रणबीरच्या आयुष्यात कतरीना कैफ (Katrina Kaif) आली हे दोघे रिलेशनशिप मध्ये होते. दोघेजण लिव्हइन मधेही राहत होते. हे नातंसुद्धा फार काळ टिकलं नाही काही वर्षातच संपलं. त्यानंतर रणबीरच्या आयुष्यात आलिया भट (Alia Bhatt) आली आणि दोघांनी लग्नही केलं. त्यांना एक गोंडस मुलगी आहे तीच नाव राहा आहे. आता रणबीर कपूरचा सुखी संसार सुरु आहे.
मधल्या काही काळात रणबीरच्या करिअरमध्ये मोठा ‘बॅड पॅच’ आल्यानंतर रणबीरने ‘अॅनिमल’ हा सुपरहिट सिनेमा दिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. रणबीर या चित्रपटात त्यांच्या लूकने चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. याशिवाय त्याचा आलिया भट सोबतचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ही तुफान गाजला होता. या दोन्ही चित्रपटांचे सीक्वेल परत एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसंच रणबीर, आलिया आणि विकी कौशल हे तिघेही एकत्र संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात झळकणार आहे.