21 C
New York

Pm Narendra Modi : अर्थसंकल्पाआधीच PM मोदींची तंबी!

Published:

राजकीय हेतूसाठी संसदेचं कामकाज बंद पाडू नका, अशी तंबीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी विरोधकांंना अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी दिलीयं. दरम्यान, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आज पहिल्यांदा संसदेत अर्थंसंकल्प सादर होत आहे. आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत असून संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी संसदेत संबोधित करत आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातल्या जनतेला जी गॅरंटी आम्ही दिलीयं, क्रमानूसार प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण पुढे जात आहोत. संसदेत सादर होणारं बजेट अमृत काळातील एक महत्वपूर्ण आहे. लोकसभा निवडणूक संपली आहे, आता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत जनतेची कामे केली पाहिजे, त्यासाठी आपण मिळून प्रयत्न करु, राजकीय हेतूसाठी संसदेचं कामकाज बंद पाडणं योग्य नाही, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ,अडचणीत येणार ट्रस्ट

भारत अर्थव्यवस्थेच्याबाबतीत जलदगतीने पुढे जात असून हा अर्थसंकल्प पुढील पाच वर्षासाठी दिशा ठरवणारा आहे. भारताच्या विकासयात्रेचा हा महत्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळे सर्वपक्षीय खासदारांना विनंती आहे की, जानेवारीपासून आपल्याकडे जेवढं सामर्थ्य होतं ते वापरुन जेवढी लढाई लढायची होती ती लढली आहे. आता जनतेने जे सांगायचं होतं ते सांगितलं पण आता ते संपलं आहे. जनतेच्या विकासासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येत काम करण्याची जबाबदारी असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय.

पुढील 2029 च्या निवडणूकीदरम्यान सर्व खासदारांनी पुन्हा मैदानात उतरावं. निवडणूक काळातील सहा महिने जे खेळ खेळायचे ते खेळा पण तोपर्यंत फक्त देश देशातले गरीब, शेतकरी महिला युवकांच्या सामर्थ्यासाठी जनआंदोलन उभं करुन ताकद लावा. 2014 नंतर कोणी खासदार पाच वर्षांसाठी आले तर काही खासदार 10 वर्षांसाठी आले पण अनेक खासदार होते त्यांना आपल्या मतदारसंघावर चर्चा करण्याची संधी मिळाली नाही कारण विरोधकांनी संसदेच्या वेळेचा दुरुपयोग केला, त्यामुळे आता कमीत कमी पहिल्यावेळा संसदेत आलेल्या खासदारांना संधी द्या त्यांच्या विचारांना संधी द्या, आवाहन मोदींनी केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img