3.7 C
New York

Maratha Reservation : आरक्षणाचा मुद्दा तोडीस नेण्यासाठी पवार CM शिंदेंची भेट घेणार

Published:

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला (Maratha Reservation) मराठा आरक्षणाचा प्रश्न काही आणखी मार्गी लागलेला नाही. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Maratha Reservation दुपारची वेळ

विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसंच, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आमने सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, राज्यातील विविध प्रश्नांवरही शरद पवार मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यानुसार आज दुपारी ३ वाजता शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट होण्याची शक्यता आहे.

‘या’ योजनेवरून अजित दादांनी विरोधकांना खडेबाल सुनावले

काही दिवसांपूर्वी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते हजर राहिले नव्हते. त्यावरून सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीवर टीका केली होती. तसंच, शरद पवार यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीचे नेते या बैठकीले गेले नाहीत, असा आरोपही झाला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली होती. तसंच, या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण कलुषित झाल्याचं सांगत परिस्थिती निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.

Maratha Reservation भुजबळ पवार भेट

काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांनी महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक जे आहेत मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत, काही लोक ओबीसी, धनगर किंवा कोणत्याही समाजाच्या दुकानात जात नाही. अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की हे सर्व शांत झालं पाहिजे अशी विनंती केली होती. त्यावेळी शरद पवारांनी आपण या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img