3.6 C
New York

Rahul Gandhi : पेपरफुटीवरुन राहुल गांधी आक्रमक, शिक्षणमंत्र्यांचेही सडेतोड उत्तर

Published:

नवी दिल्ली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Parliament Session) आजपासून सुरू होत आहे. आज अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman) या मोदी सरकारचा (Modi Govt) आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. तत्पुर्वी संसदेत पेपर फुटीवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पेपर फुटीप्रकरणावरुन (Paper Leak) शिक्षणमंत्र्यांच्या (Dharmendra Pradhan) राजीनाम्याची मागणी केली. ज्यानंतर मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

राहुल गांधी म्हणाले की, पेपरफुटीची चर्चा केवळ NEET च्या संदर्भात होत नाही तर ती सर्व परीक्षांबाबत आहे. हा गंभीर विषय आहे. शिक्षणमंत्र्यांनी सगळ्यांच्या चुका सांगितल्या पण स्वत:बद्दल बोलले नाहीत. त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी काय केले? असा थेट सवाल उपस्थित केला. तसेच भारताची परीक्षा पद्धत खोटी असल्याची त्यांना पूर्ण खात्री आहे. लाखो लोकांना वाटते की तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही भारताची परीक्षा प्रणाली विकत घेऊ शकता. विरोधकांनाही तेच वाटते. जर ही समस्या असेल तर तुम्ही ती सोडवण्यासाठी काय करत आहात? असेही राहुल गांधी पुढे म्हणाले.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, दरम्यान NEET वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मला या मुद्द्यावर राजकारण करायचे नाही. यूपीचे मुख्यमंत्री असताना अखिलेश यांच्या कारकिर्दीत किती पेपर लीक झाले आहेत हे सर्वांच्या लक्षात आहे असं म्हणत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विरोधकांना प्रत्यूत्तर दिले.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, केवळ आरडाओरडा करून खोटे सत्य बनत नाही. देशाची परीक्षा पद्धत मूर्खपणाची असल्याचे विरोधी पक्षनेत्याचे विधान अत्यंत निषेधार्ह आहे. मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. विरोधी पक्षनेत्याचे काहीही होऊ शकत नाही. संपूर्ण परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. असं प्रत्युत्तर धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधींच्या टिकेला दिले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img