3.8 C
New York

Mumbai Goa Highway : परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Published:

मुंबई

मागील काही दिवसांपासून कोकणासह (Konkan) राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अखेर बहुप्रतीक्षित अशा मान्सूनने राज्यात दमदार एंट्री केली आहे. अशातच पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) रस्त्यांची परिस्थिती समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील (Parshuram Ghat) रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला मुसळधार पावसाचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाटातील मातीच्या डोंगरांवरील दगड आणि माती थेट रस्त्यावर पडत आहे. तर डोंगरातून पाणी देखील रस्त्यावर कोसळत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

परशुराम घाटात मुसळधार पाऊस झाल्यास दरवर्षी दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडतांना दिसतात. यंदा देखील या घटनेचा धोका अधिक आहे. दरम्यान, परशुराम घाटात कोणत्याही अनपेक्षित घटना घडू नये म्हणून संरक्षण भिंतीचं काम करण्यात येत होते. मात्र ते अपूर्णच ठेवल्याचे पाहायला मिळतंय. तर परशुराम घाटात संरक्षक भिंत नसल्याने वाहतुकीला धोका निर्माण झालाय. तर पावसामुळे दगड आणि माती थेट रस्त्यावर पडत असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img