3 C
New York

Maval Crime : अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांड, मावळ हादरले

Published:

मावळ

पुणे जिल्ह्यातील मावळमधून एक (Maval Crime) धक्कादायक घटना पुढे येत आहे. अनैतिक संबंधातून प्रेग्नंट राहिलेल्या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला. नंतर त्या महिलेच्या मृतदेहाची इंद्रायणीच्या पात्रात विल्हेवाट लावण्यात आली. त्यावेळी आरडाओरड करणाऱ्या तिच्या मुलांनाही इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे.

राज्याला हादरवून सोडणारी ही घटना पुण्यातल्या मावळात घडली आहे. तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला अन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आलं आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही संतापजनक घटना 9 जुलैला घडली. 6 जुलैला गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला. या धक्कादायक घटनेनंतर आंबी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. पोलिस आरोपीच्या शोधात असून घटनेचा कसून तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img