3.6 C
New York

NEET Paper Leak : सुप्रीम कोर्टात आज ‘NEET’ प्रकरणी सुनावणी

Published:

शभरात अनेक दिवसांपासून वादा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला विषय म्हणजे नीट पेपर लीक प्रकरण. त्यामध्ये राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेच्या(नीट) अनुषंगाने दाखल झालेल्या चाळीसपेक्षा जास्त याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. ( NEET Paper Leak) मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने शहर आणि परीक्षा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) दिले होते. त्यानुसार एनटीएने शनिवारी शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर केला होता.

NEET Paper Leak अंतिम निकाल

आज सकाळी १० वाजल्यापासून ‘नीट’ संदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. समुपदेशन तोंडावर आलं असल्याने याचिकांवर न्यायालय अंतिम निकाल देणार काय, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. नीट-यूजी परीक्षा पुन्हा घेण्यात यावी असं वाटत असेल तर व्यापक प्रमाणात प्रश्नपत्रिका फुटल्याचं सिद्ध करा, अशी विचारणा सरन्यायाधीशांनी मागीलवेळी याचिकाकर्त्यांना केली होती.

अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर!

NEET Paper Leak ७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुन्हा एकदा जे शहर आणि केंद्रनिहाय निकाल आले आहेत ते चकित करणारे आले आहेत. त्यामुळे यासंदर्भात न्यायालय काही भाष्य करणार काय? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. ७० टक्के विद्यार्थी गुजरातमधील राजकोट केंद्रातील नीट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. १२ विद्यार्थ्यांना सातशेपेक्षा जास्त गुण विशेष म्हणजे प्राप्त झाले आहेत. याचप्रमाणे राजस्थानमधील सिकर येथील केंद्रातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राजस्थानचा विचार केला तर सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ४८२ इतकी आहे. महाराष्ट्रात हीच संख्या २०५ इतकी आहे. केरळ आणि उत्तर प्रदेश असून वरील राज्यांतील क्रमश: १९४ आणि १८४ विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर क्रमश: सातशेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

NEET Paper Leak ४०४ केंद्रातून परीक्षा

२३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ३२१ विद्यार्थ्यांना यंदा नीट परीक्षा देणाऱ्या सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले. हे विद्यार्थी २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २७६ शहरांतील एक हजार ४०४ केंद्रातून परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले असून त्यापैकी अनेकजण पारंपारिक शिकवणी वर्गांचे विद्यार्थी नाहीत, याकडं सूत्रांनी लक्ष वेधलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img