Health Tips शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारचे आहार घेतात. पण आहार बदलल्याने कधी कधी फारसा फायदा होत नाही. फक्त डाएटच नाही तर लोक जिम करून सप्लिमेंट्सही घेतात. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही थकवा जाणवत असेल, तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. जर तुम्हालाही काय खावे, कसे खावे आणि काय खाऊ नये असं समजत नसेल तर आता तुम्हाला जास्त गोंधळून जाण्याची गरज नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही कच्चे पदार्थ असतात ज्यांचे शिजवलेल्या पदार्थांपेक्षा जास्त फायदे होतात. त्यात पोषक घटक असतात. कच्चा पदार्थ शरीरासाठी फायदेशीर तर असतोच पण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला हेल्दी डाएट फॉलो करण्यासाठी काय खाल्लं पाहिजे हे सांगणार आहोत.
या पावसाळ्यात मुलांना व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी या 5 प्रभावी टिप्स
कच्चे गाजर
Health Tips: कच्च्या गाजरांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, के, सी, कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळतं. तुम्हाला हे माहित आहे का की गाजर शिजवून खाण्यापेक्षा कच्च खाण्याचे जास्त फायदे आहेत. कच्च्या गाजरात असलेले अँटीऑक्सिडंट डोळे, त्वचा आणि पोटाशी संबंधित समस्यांवर फायदेशीर ठरतात.
बीटरूट
हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत असल्यास आहारात बीटरूटचा समावेश नक्की करा. हे खाल्ल्याने हिमोग्लोबिन तर वाढतेच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. सलाडमध्ये बीटरूट कच्चेही खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचा रस देखील पिऊ शकता. बीटरूट कर्करोग, हृदयरोग,आणि यकृत यासह अनेक रोगांपासून संरक्षण करते.
टोमॅटो
व्हिटॅमिन ए, सी, फायबर आणि कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा टोमॅटोमध्ये समावेश असतो. टोमॅटो हा भाजीची चव बदलतोच मात्र त्याचबरोबर सलाडमध्येही कच्चा खाल्ला जातो. टोमॅटो अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असलेला कर्करोग आणि मधुमेह अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. त्यामुळे आतापासूनच तुम्हाला निरोगी राहायचंय तर या कच्च्या भाज्या खाण्यास नक्कीच सुरुवात करा.