21 C
New York

Mumbai Rains : मुंबईत पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता

Published:

महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. (Mumbai Rains) मात्र, काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. मुंबई, पुण्यासह कोकण आणि विदर्भात पावसाने सरासरी ओलांडली आहे. राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आहे. १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक आणि विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतिक्षा आहे. परंतु विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पाणीच पाणी आहे. अनेक ठिकाणी पूर आला असून धरणांचे दरवाजे उघडले आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचे पाणी पातळी 38 फूट आठ इंचावर आले आहे. 39 फुटांवर आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी आहे.सोमवारी पहाटेच पावसाने जोर पकडल्याने आठवड्याच्या सुरुवातीलाच कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली आहे. (Mumbai Rains chances of heavy rain in next 24 hours in Mumbai)

मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्येही सतत पाऊस पडत असल्याने ती भरण्यास सुरुवात झाली आहे. तर, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सर्वात कमी पाणी साठवण क्षमता असलेला मुंबई उपनगरातील तुळशी तलाव हा शनिवारी सकाळी 8.30 वाजता भरून वाहू लागला. त्यामुळे मुंबईकरांना आता इतर तलाव भरण्याची प्रतीक्षा आहे. परंतु, थोड्याथोड्या अंतराने मुसळधार पावसाच्या सरी बरसत असल्याने सकाळच्या वेळी कार्यालयात आणि दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.

मुसळधार पावसाचा तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवेवर परिणाम

Mumbai Rains आज दिवसभर पावसाचा जोर असणार

कोकणातही मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. काजळी नदी 17 मीटरवर, गोदावरी नदी 7 मीटरवर, मुचकुंदी नदी चार मीटरवर तर तर जगबुडी 6.85 मीटरवर आहे. काजळी नदीचे रौद्ररूप अजूनही कायम आहे. कोल्हापूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शेजारी, जाधववाडी येथे २ फूट पाणी आले आहे. यामुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे.मुंबईतील अनेक भागांत सोमवारी सकाळी जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कल्याण डोंबिवलीतही मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात व रस्त्याच्या कडेला पाणी सचण्यास सुरवात झाली आहे. ठाण्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील धरणे भरली आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img