23.1 C
New York

Bad Newz 3rd Day Collection: Bad Newz बॉक्स ऑफिसवर ठरला Good News देणारा चित्रपट

Published:

Bad Newz 3rd Day Collection: विकी कौशल, (Vicky Kaushal) एमी विर्क (Amy Virk) आणि तृप्ती डिमरी (Trupti Dimri) स्टारर ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरला आहे. आणि विशेष म्हणजे विकी कौशलच्या कारकिर्दीतला ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट हिट चित्रपटांपैकी एक आहे. दिग्दर्शक आनंद तिवारी यांचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट १९ जुलैला सर्व चित्रपटगृहात रिलीज झाला. चाहत्यांमध्ये सध्या सर्वत्र या चित्रपाटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला पहिल्याच विकेंडमध्ये दमदार प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या विकेंडमध्ये चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय जाणून घेऊया…

Bad Newz 3rd Day Collection: मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाला पहिल्याच विकेंडमध्ये अफलातून प्रतिसाद मिळालेला आहे. चित्रपटाने तीन दिवसांत तब्बल ३० कोटींची कमाई केलेली आहे. पहिल्या दिवशी ८.३ कोटी, तर दुसर्‍या दिवशी १०.२५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ११.१५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दणक्यात प्रतिसाद मिळत असून चाहते सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटाला मिळत असलेला दमदार प्रतिसाद पाहून विकी कौशलसोबतच चित्रपटाच्या इतर कलाकारांनाही आनंद गगनात मावेनासा झालाय.

“मी ‘चीटर’ असल्याचा टॅग लागला”, रणबीर कपूरने केल दुःख व्यक्त

Bad Newz 3rd Day Collection: या चित्रपटातलं विकी कौशल आणि तृप्ती डिमरीचं ‘तौबा तौबा’ हे गाणं केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही हिट झाल्याचं पाहायला मिळतंय. विकी कौशलच्या हुक स्टेप्स सर्वांच्याच पसंतीस पडल्या आहेत. यासाठी विकी कौशलचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. ट्रेलर रिलीज होताच त्यामधली विकी कौशल आणि तृप्ती डिमरी या दोघांची केमेस्ट्री आणि कॉमेडी पाहून प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली होती. ‘बॅड न्यूज’ हा २०१९ च्या ‘गुड न्यूज’ फ्रेंचाइजी चित्रपटाचा सिक्वेल आहे, जो इशिता मोईत्रा आणि तरुण दुडेजा यांनी लिहिलेला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलंय की सलोनी बग्गा (तृप्ती डिमरी) हीच्या पोटात जुळी मुली आहेत. हसण्यासारखी गोष्ट अशी की, या जुळ्या मुलांना एक नाही तर दोन वडील (विकी आणि एमी) आहेत. आता या दोघांमधलं ती आपल्या मुलाचा बाप म्हणून कोणाला निवडणार, याबद्धलची कथा दाखवण्यात आली आहे. पुढे अजून कितीचा गल्ला कमावणार हा चित्रपट हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img